बिश्नोईच्या धमक्यांमुळे सलमानने घेतली बुलेटप्रुफ कार, सुरक्षेतही केली वाढ

19 Oct 2024 13:45:30
 
salman khan
 
 
मुंबई : लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सध्या त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटातील नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बिश्नोई गॅंगने या हत्येची जबाबदारी घेतली होती. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर त्याला जीवे मारण्च्या धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता सलमानने स्वसंरक्षणासाठी नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. सलमानने बुलेट प्रूफ निसान एसयूव्ही कार घेतली असून थेट दुबईतून त्याने गाडी मागवली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या बुलेट प्रुफ कारची किंमत २ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतल्यानंतर सलमान खानने काळवीट प्रकरणी माऱी मागावी अशी मागणी वारवार बिश्नोई गॅंगकडून केली जात आहे. शिवाय आता नुकतीच त्यांनी ५ कोटी रुपयांची खडंणी मागितली असून ती न दिल्यास बाबा सिद्दीकीपेक्षा सलमानची अवस्था वाईट करु अशी धमकी दिली आहे.
 
दरम्यान, सुरक्षेसाठी घेतलेल्या गाडीत बॉम्ब अलर्ट इंडिकेटर, गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी जाड मजबूत काच आणि टिंटेड खिडक्या आहेत, जेणेकरून वाहन चालक आणि वाहनात बसलेल्या व्यक्तीला पाहता येणार नाही. दरम्यान, एकीकडे सलमान स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत असून दुसरीकडे तो बिग बॉस १८ चं चित्रिकरणही करत आहे. १७ ऑक्टोबर रोजी सलमान 'बिग बॉस' च्या सेटवर पोहोचला होता आणि त्याने 'वीकेंड का वार'चे दोन्ही भागांचे चित्रिकरण केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0