नांदेडमध्ये जिहाद्यांकडून महादेव मंदिराची विटंबना

19 Oct 2024 14:47:29

Nanded Mahadeo Mandir News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nanded Mahadeo Mandir)
इस्लामिक कट्टरपंथींनी हिंदूंच्या मंदिरांची विटंबना केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे घडली आहे. गावातील महादेव मंदिर संस्थान, गणपती मंदिरावर दगडफेक त्यासोबतच मंदिरावर चपला मारल्याचा प्रकारही यावेळी घडला आहे. या प्रकरणी ३४ जिहादी आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे वाचलंत का? : उद्योग, व्यापार आणि विकासाचे वाहक बनण्याचा संकल्प करा

मिळालेल्या माहितीनुसार, संदल मिरवणुकीत जातीय तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह गाणी डीजेवर वाजवली जात होती. मिरवणूक गावातील महादेव मंदिर संस्थान समोर येताच जमाव प्रक्षोभक झाला. पोलिसांनी यावेळी डिजे बंद करायला लावला म्हणून जमावाने प्रक्षोभक घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

शिवचैतन्य शिवाचार्य महाराज या प्रकरणी म्हणाले की, जमालातील एक जिहाद्याकडून हिंदू महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. जमावाने महादेव मंदिर संस्थानचा सीसीटिव्ही कॅमेरे फिरवून मंदिरावर दगडफेक व अश्लील हातवारे केले. त्याचवेळी जवळ असलेल्या अशोक कुटे यांच्या घराच्या पत्रावरून आत उडी मारत एका मुस्लिम जिहाद्याने घरात एकट्या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

Powered By Sangraha 9.0