मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री झाल्याने रेस्टॉरंटवर बुलडोझर

    19-Oct-2024
Total Views |

Bulldozer Pattern
 
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे मुबीन नावाचा कट्टरपंथी मामा-भांजे या नावाने रेस्टॉरंट चालवत होता. त्याने आपली ओळख लपवून अवैध खाद्यपदार्थ विकल्याचा आरोप आहे. मुबीनने शाकाहारी जेवणाच्या नावाखाली अवैध मांसाहरी पदार्थ विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कानपूर महापालिकेने आता त्यांच्या रेस्टॉरंटवर बुलडोझर चालवला असल्याची माहिती आहे.
 
कानपूर महापालिकेने मुबीनच्या रेस्टॉरंटवर अतिक्रमणाचे आरोपही तपासण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणात शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी कानपूर येथे महापालिकेने रेस्टॉरंटबाहेर असलेले अतिक्रमण तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात आता मुबीनविरूद्ध चौकशी सुरु आहे.
 
बजरंग दलाने यापूर्वीही मामा-भांजे रेस्टॉरंटला विरोध केला होता. बजरंग दलाच्या तक्रारीच्या आधारे मुबीनच्या दुकानातून खाद्यपदार्थाचे काही नमुने घेण्यात आले आहेत. मात्र त्या अन्न पदार्थाची पडताळणी करत त्याचा अहवाल येणे बाकी आहे.