अयोध्येच्या दीपोत्सवात घरबसल्या सहभागी होता येणार!

19 Oct 2024 17:41:02

Ayodhya Deepotsav
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ayodhya Deepotsav 2024) अयोध्येत दरवर्षी शरयू नदीच्या काठावर भव्य दिपोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी ३० ऑक्टोबर रोजी दीपोत्सव होणार असून त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यंदा २५ लाख दिवे लावून नवा विश्वविक्रम केला जाणार असल्याची माहिती आहे. परंतु देशातीलच नाही तर जगभरातील रामभक्तांना घरबसल्या अयोध्येच्या दीपोत्सवात घरबसल्या सहभागी होता येणार असल्याची खुशखबर योगी सरकारने दिली आहे. योगी सरकारच्या विकास प्राधिकरणा अंतर्गत ऑनलाइन माध्यमातून दिवे दान करून दीपोत्सवात सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन दिवे दान करून तुम्ही तुमच्या घरी प्रसाद सुद्धा मिळवू शकता. जो उत्तर प्रदेश राज्य ग्रामीण आजीविका मिशनद्वारे तयार केला जाणार आहे.

https://www.divyaayodhya.com/bookdiyaprashad या संकेतस्थळावर जाऊन आपण आपली नोंदणी करू शकता.
Powered By Sangraha 9.0