महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू

17 Oct 2024 18:43:00
रंगभूमी 
 
मुंबई दि. १७ : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. 15 ऑक्टोबर २०२४ रोजी सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. यानिमित्ताने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
 
मागील अनेक वर्षापासून महामंडळाचे कर्मचारी ७ व्या वेतनापासून वंचित होते. त्यामुळे हा वेतन लागू व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतांना अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने दिवाळीपूर्वी अविस्मरणीय भेट प्रशासनाने दिल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी कर्मचाऱ्याना लागू होणार आहे.
 
कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू- रावराणे, विशेष कार्यकारी अधिकारी संजय पाटील यांचेही कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले .
Powered By Sangraha 9.0