आयटी कंपनी 'विप्रो'कडून भागधारकांसाठी बोनस शेअर्सची घोषणा; जाणून घ्या तपशील!

    17-Oct-2024
Total Views |
wipro announced bonus share


मुंबई :   देशातल्या दोन बड्या आयटी कंपन्यांनी तिमाही निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर तिमाहीत विप्रोचा निव्वळ नफ्यात मोठी वाढ झालेली आहे. विप्रो कंपनीच्या निव्वळ नफ्यात २१ टक्क्यांनी वाढ होत ३,२०९ कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीने आपल्या भागधारकांसाठी मोठा निर्णय देखील घेतला आहे. यावेळी संचालक मंडळाने बोनस शेअर देण्याची घोषणादेखील केली आहे.




विप्रो कंपनीने भागधारकांना १:१ बोनस शेअर जाहीर केला असून एकावर एक शेअर फ्री मिळणार आहे. देशातील चौथी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेली विप्रो कंपनी लाभांश आणि बोनस शेअरसाठी नेहमीच चर्चेत असते. कंपनीच्या माहितीनुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत तिचा नफा २१.३ टक्के वाढीसह ३,२०९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने २,६४६ कोटींचा नफा नोंदविला होता.


कंपनीकडून बोनस शेअर्सही जाहीर

विप्रो कंपनीने प्रति १ शेअर १:१ बोनस शेअरसाठी संचालक मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. शेअरहॉर्सकडून मान्यता मिळाल्यानंतर रेकॉर्ड डेटही जाहीर केली जाणार आहे. बोनस इश्यूनंतर पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटल अंदाजे २०,९२५,९४३,१२८ रुपये असणे अपेक्षित आहे, ज्यात प्रत्येकी २ रुपयांचे १०,४६२,९७१,५६४ इक्विटी शेअर्स आहेत. विशेष म्हणजे पुढील २ महिन्यांत म्हणजेच दि. १५ डिसेंबर २०२४ पूर्वी बोनस शेअर्स गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केले जातील.