खाद्य पदार्थांमध्ये घाणीची भेसळ केल्यास होणार कठोर शिक्षा

उत्तर प्रदेशात योगी सरकार नवा कायदा आणणार

    17-Oct-2024
Total Views |

Yogi Adityanath
 
नवी दिल्ली : ( Uttarpradesh )उत्तर प्रदेशात खाद्य पदार्थांमध्ये अखाद्य पदार्थ आणि घाणीचे भेसळ केल्यास कठोर शिक्षा होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा प्रकारांविरोधात लवकरच कायदा आणण्याची घोषणा केली आहे.
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘एक्स’वर त्याची माहिती दिली. ते म्हणाले, अन्न आणि पेयांमध्ये अखाद्य आणि घाणेरड्या गोष्टींची भेसळ करणे हे असंस्कृत आणि अमानवी वर्तन आहे. आरोग्यावर विपरित परिणाम करणारे आणि सामाजिक एकोपा बिघडवणारे असे घृणास्पद, घृणास्पद कृत्य अजिबात मान्य करता येणार नाही. खाद्यपदार्थांची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार लवकरच कठोर कायदे आणणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धा आणि आरोग्याचे रक्षण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
 
योगी सरकारने ‘छद्म एवं सौहार्द विरोधी क्रियाकलाप निवारण एवं थूकना प्रतिषेध अध्यादेश २०२४’ आणि 'युपी प्रिवेंशन ऑफ़ कॉन्टेमिनेशन इन फूड (कंज्यूमर राइट टू नो) अध्यादेश २०२४' आणण्याची तयारी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना निर्देश दिले आहेत. या अध्यादेशांद्वारे अन्नावर थुंकणाऱ्यांसाठी शिक्षेची कडक तरतूद केली जाऊ शकते. यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अन्नाची संपूर्ण माहिती मिळवण्याचा अधिकार असेल. हे दोन्ही अध्यादेश एकमेकांशी संबंधित आहेत.