
नवी दिल्ली(Supreme Court): सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली असून हातातील तलवारीची जागाही भारतीय संविधानाने घेतली आहे. नवी प्रतिमा भारताच्या न्यायव्यवसथेच्या नव्या युगाकडे निर्देश करत आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे. न्यायमूर्तींच्या वाचनालयात बसवण्यात आलेल्या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. पारंपारिक मूर्तीप्रमाणेच न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे, त्याचवेळी दुसऱ्या हातात तलवारीऐवजी भारताचे संविधान आहे.
प्रतिकात्मकदृष्ट्या पाहिले तर काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेली न्यायदेवतेची नवीन मूर्ती न्याय आंधळा नसतो असा स्पष्ट संदेश देत आहे. त्याचप्रमाणे संविधानाच्या आधारे काम करतो, असाही संदेश यातून मिळतो. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायदेवतेच्या नव्या प्रतिमेवर भाष्य करताना, डी. वाय. चंद्रचूड म्हणाले " न्यायदेवतेच्या हाती तलवारी ऐवजी संविधान असायाला हवे, जेणेकरुन, संविधानाच्या चौकटीत न्याय होतो हे लोकांच्या लक्ष्यात यावे. तलवार हे हिंसेचे प्रतीक आहे. न्यायदानामध्ये कुठल्याही प्रकारचा हिंसाचार अपेक्षित नाही. न्याय हा संविधानाच्या चौकटीतच दिला जातो.