महर्षी वाल्मिकींना प्रणाम! जय श्रीराम...SSS नायाब सिंह सैनी बनले दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री

    17-Oct-2024
Total Views |

saini
 
चंडीगड : हरियाणा राज्यात सलग तिसऱ्यांदा विजय खेचून आणणाऱ्या भाजप सराकरचा शपथविधी १७ ऑक्टोबर रोजी हरियाणातील पंचकुला येथे पार पडत आहे. नायाब सिंह सैनी यांच्या खांद्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.

नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी
मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्यासह १३ नेत्यांची हरियाणा विधानसभेवर वर्णी लागली आहे. महिपाल धांडा यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह कृष्णलाल पनवार आणि दोन वेळा आमदार राहिलेले कृष्णा बेदी यांचा सुद्धा समावेश झाला आहे. अरविंद शर्मा, गौरव गौतम, किरण चौधरी, श्रुती चौधरी, राव नरबीर सिंग, आरती राव (केंद्रीय मंत्री राव इंद्रजित यांची मुलगी), रणबीर सिंग गंगवा, राजेश नागर, श्याम सिंग राणा आणि विपुल गोयल यांनी सैनी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली.

एनडीएच्या नेत्यांची बैठक
पंतप्रधान मोदी यांनी आज एनडीएच्या सर्व मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, नायबसिंग सैनी यांच्या शपशविधी समारंभानंतर, ही बैठक चंडीगड मध्ये पार पडणार आहे. एकूण १३ मुख्यमंत्री आणि १६ उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, सिक्कीम, नागालँड आणि मेघालय शासित भाजपचे एनडीएतील भागीदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सदर बैठीकत, राष्ट्रीय विकासाच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. त्याच सोबत, संविधान अमृत महोत्सव यावर देखील विचार विमर्श होणार आहे.