'इन्फोसिस' तिमाही निकाल; निव्वळ नफा वाढीसह भागधारकांना अंतरिम लाभांश जाहीर!

    17-Oct-2024
Total Views |
infosys quarterly results declared
 

मुंबई :   देशातील आयटी कंपनी इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै ते सप्टेंबर कालावधीत कंपनीने ६,५०६ कोटींचा नफा कमावल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, बाजार बंद होताच इन्फोसिसने भागधारकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली असून कंपनीने समभागधारकांना लाभांश जाहीर केला आहे.




जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीने ६,५०६ कोटींचा नफा कमविला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ४.७ टक्क्यांनी वाढून सहा हजार कोटींच्या पुढे गेला आहे. तर मागील वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ६,२१२ कोटी रुपये इतका नफा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार यंदा २.२ टक्क्यांनी वाढ दिसून येत आहे.

याशिवाय इन्फोसिस कंपनीचा महसूलही तिमाहीत ४.२ टक्क्यांनी वाढून ४०,९८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत महसूलात ५ टक्के वाढीसह ४०,९८६ कोटी झाला आहे. समभागधारकांना आनंदाची बाब म्हणजे कंपनीने जाहीर केला लाभांश. इन्फोसिसने प्रति शेअर २१ रुपये अंतरिम लाभांश घोषित केला असून दि. २९ ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख आणि ८ नोव्हेंबर ही पेआउट तारीख म्हणून निश्चित केली आहे.