किवी गोलंदाजांसमोर टीम इंडिया नेस्तानाबूत; पहिला डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला

    17-Oct-2024
Total Views |
indian-players-did-not-work-in-bengaluru-collapsed


मुंबई :   
भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येत आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे मालिकेतील पहिला सामना सुरू असून पहिल्या डावात टीम इंडियाने घरच्या मैदानावर आजवरची सर्वात कमी धावसंख्या ४६ केली आहे. पहिला दिवस पावसामुळे रद्द केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या खेळात अवघ्या ४६ धावांवर टीम इंडिया डाव आटोपला. टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा यष्टीरक्षक रिषभ पंत (२० धावा) करता आल्या.


हे वाचलंत का? -    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड होणार निवृत्त, कोणाच्या हाती असणार धुरा?


दरम्यान, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर डावाची सुरूवात करताना पहिला विकेट ९ धावांवर रोहित (२ धावा) गेल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पहिल्या डावात टीम इंडियाचे पाच फलंदाज एकही धावा न करता बाद झाले आहेत. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मॅट हेन्रीने सर्वाधिक(१५ धावा ५ विकेट) घेतल्या. तर विलियम ओर्रूकने ४ विकेट्स घेत टीम इंडियाला धक्का दिला.


घरच्या मैदानावरील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या

टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत ऑलआऊट झाली. घरच्या मैदानावरील कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. याआधी १९७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने केवळ ७५ धावा करत गारद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या असून २०२० मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ३६ धावांत गारद झाला होता त्यानंतर आता टीम इंडिया घरच्या मैदानावर ५० धावांचा टप्पाही पार करू शकली नाही.