मागील दहा वर्षांत कर संकलनात वृध्दी; दशकभरात १८२ टक्क्यांनी वाढ

17 Oct 2024 19:27:50
direct-tax-collection-increased


मुंबई :    केंद्र सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात कर संकलनात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १९.६० लाख कोटी रुपये कर संकलन झाले आहे. तसेच, गेल्या दहा वर्षांतील प्रत्यक्ष कर संकलन १८२ टक्क्यांनी वाढले आहे. तर दुसरीकडे, २०१४-१५ आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ८.६१ कोटींहून अधिक आयकर रिटर्न्स भरले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात प्रत्यक्ष कर संकलन मोठी वाढ दर्शविली आहे.




दरम्यान, प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या ताज्या 'टाइम सीरीज डेटा'मधून मोठी माहिती समोर आली आहे. कॉर्पोरेट कर संकलन १० वर्षांत दुप्पट होऊन २०२३-२४ मध्ये ९.११ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. या कालावधीत वैयक्तिक आयकर संकलन जवळपास चौपट वाढून १०.४५ लाख कोटी रुपये झाले आहे. प्रत्यक्ष कर संकलन सुमारे ६.९६ लाख कोटी रुपयांसह सुमारे ४.२९ लाख कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर आणि २.६६ लाख कोटींचा वैयक्तिक आयकर समाविष्ट आहे.




Powered By Sangraha 9.0