रेल्वेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ तर ऑटो क्षेत्रातील घसरणीने सेन्सेक्स, निफ्टीत पडझड!

    17-Oct-2024
Total Views |
decline-in-auto-sector-sinks-market-sensex-falls


मुंबई :
     रेल्वेसंबंधित कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ दिसून आली आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन(आयआरएफसी), इरकॉन इंटरनॅशनल, RITES, रेल विकास निगम(आरव्हीएनएल), टीटागढ रेल सिस्टम(टीआरएसएल) या कंपन्यांच्या समभागांमध्ये २.४५ टक्के ते ७.२७ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली आहे.
दरम्यान, मोदी सरकारने पायाभूत सुविधांवर दिलेला भर पाहता रस्ते वाहतुकीसह रेल्वेमार्ग अद्ययावत करण्याकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या समभागात मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पामुळे विविध कंपन्यांच्या शेअर्स ७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असून याची अंदाजे किंमत २,६४२ कोटी रुपये आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे २८ दशलक्ष टन अंदाजे अतिरिक्त मालवाहतूक क्षमतेसह रेल्वेची मालवाहतूक क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. यासर्व घटनांचा परिणाम कंपन्यांच्या समभागावर दिसून आला आहे.

ऑटो क्षेत्रातील घसरणीने बाजार आज कोसळला. सेन्सेक्स ४९४.७५ अंकांनी ८१,००६.६१ पातळीवर बंद झाला. निफ्टीने देखील मोठी घसरण घेतली असून २२१.४५ अंकांची घरसत २४७४९.८५ वर स्थिरावला. बाजारातील घडामोडीकडे रिअल्टी, ऑटो, ग्राहक विवेकाधिकार आणि ग्राहक टिकाऊ समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बाजारात पडझडीचे चित्र पाहायला मिळाले.