वांद्रे पूर्व मतदारसंघात उबाठा गटाचा उमेदवार ठरला!

17 Oct 2024 15:35:01
 
Uddhav Thackeray
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु आहे. अशातच मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उबाठा गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. याठिकाणी वरुण सरदेसाई यांना तिकीट देण्यात येणार असल्याचे उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी एका मेळाव्यात जाहीर केले.
 
याबद्दल बोलताना अनिल परब म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी मी साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारीही त्यांना जाऊन भेटलो. उद्धव साहेबांनी वांद्रे पूर्व विधानसभेचे उमेदवार म्हणून वरुण सरदेसाई यांचं नाव निश्चित केलेलं आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर!
 
२०१९ मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या झीशान सिद्दीकी यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यानंतर आता वरुण सरदेसाई यांना उबाठा गटाने उमेदवारी जाहीर केली असून त्यांचा सामना कोणासोबत होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0