वंचितची तिसरी यादी जाहीर! ३० उमेदवारांना संधी

17 Oct 2024 11:46:08
 
Prakash Ambedkar
 
मुंबई : विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा झाली असून सर्वच पक्षांची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी वंचितने अनुक्रमे ११ आणि १० उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या होत्या.
 


Prakash Ambedkar 
 
त्यानंतर आता बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीने ३० उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या यादीत १० मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. महायूती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चासुद्धा अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच या दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारांची घोषणा होऊ शकते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0