दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीत कट्टरपंथीचा हिंदू युवकावर चाकूने हल्ला

17 Oct 2024 18:06:29

Hindu Young Man Murder
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील देवरियाच्या सलेमपूर कोतवाली भागातील मझौलीराझ येथे बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी हिंदू मिरवणूक काढत होते. ही मिरवणूक गंडक नदीच्या तीरावर जाणार होती. यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ही मिरवणूक माढाळी राजाच्या शाही चौकात पोहोचली असता, काही कट्टरपंथींनी घसखोरी करत तरूणांसोबत वाद घातला. त्यावेळी राजन पटेल नावाच्या युवकावर चाकूने हल्ला केला असल्याची माहिती आहे.
 
या हल्ल्यात राजन गंभीर जखमी झाला असून त्याला वाचवण्यासाठी आलेल्या जितेश सिंह या तरुणालाही चाकूने वार करत जखमी केले. विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की केल्यानंतर हे सर्वजण पळून गेले असता यानंतर हिंदूंनी निदर्शने सुरू केली होती. आरोपींच्या अटकेची मागणी केली. अंगूर आलम नावाच्या व्यक्तीवर हिंदूंनी हिंसाचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
 
या घटनेत जखमी झालेल्या तरुण राजन पटेल म्हणाला, माझे नाव राजन पटेल आहे, विसर्जन मिरवणुकीत कट्टरपंथींनी येऊन वाद घातल्याने हि घटना घडली आहे. त्यानंतर हाणामारी सुरू झाली. आम्ही त्याला घटनास्थळावरून निघून जाण्यास सांगितले मात्र त्याने ऐकले नाही. त्यांनी मिळून माझ्यावर हल्ला करत मारहाण केली. माझ्या व्यतिरिक्त इतर तरूणांना मारहाण करण्यात आली आहे.
 
यावेळी पोलीस प्रशासान घटनास्थळी पोहोचले असता, त्यांनी सांगितले की, आज देवरियाच्या माझौली राजमध्ये दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. या विसर्जन मिरवणुकीवेळी काही मुलांनी थेट मिरवणुकीत घुसून वाद निर्माण झाला. त्यावेळी त्याच्यावर सध्या सालेमपूर येथे उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणात आता मुख्य आरोपी अंगूर आलम याला अटक करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0