'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ने केले नवदुर्गा जागर स्री शक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन

    17-Oct-2024
Total Views |
 
Navadurga 2024
 
मुंबई : डेक्कन एज्युकेशन सोसायटी'चे नविनचंद्र मेहता इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि अँड डेव्हलपमेंट, डी. ई. एस. मुंबई कॅम्पस दादर वेस्ट यांनी नुकताच 'नवदुर्गा २०२४ जागर स्त्री शक्तीचा' ह्या कार्यक्रमाचे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन केले होते. डॉ. सुलक्षणा विसपुते विभागप्रमुख आणि संस्कृतीक समितीच्या प्रमुख याच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
 
ह्या कार्यक्रमात ६५ मुलींनी सहभाग घेतला. या मुलींनी ९ अज्ञात वीरांगनांचे प्रेरणादायी जीवनचरित्र सादर केले, ज्यात गीता पाटील, जसवंतिबेन जमनदास पॉपट, अरुणिमा सिन्हा यांसारख्या धाडसी महिलांचा समावेश होता. या विद्यार्थिनींनी या प्रेरणादायी कथा जिवंत केल्या, प्रत्येक मुलगी तिच्या वीरांगनेच्या व्यक्तिमत्त्वानुसार साडी नेसून सादर करत होती.
 
कार्यक्रमात गायन, जोगवा नृत्य, नाटक आणि दुर्गा गीत यांसारखे चार सशक्त सादरीकरणे करण्यात आली, तर संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रसंचालन ६ मुलींनी उत्कृष्टपणे केले आणि सर्व आयोजन फक्त विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांनी केले.या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून झी स्टु़डिओ'च्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हेड श्रीमती वैशाली कानविंदे उपस्थित होत्या.
 
त्यांच्या उपस्थितीने आणि प्रेरणेने विद्यार्थिनींना नक्कीच नवा हुरूप मिळाला. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विध्यार्थिनींचा सर्वांगीन विकासव्हावा , नेतृत्त आणि आत्मविश्वास वाढावा , नेहमी पेक्षा वेगळा विचार करून त्यावर अंमलबजावणी करून कस यशस्वी होता येते आणि आपल्या प्रग्लभ अशा संस्कृती ची ओळख व्हावी असे काही प्रमुख उद्धेश होते.हे गुण त्यांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करतील असे मत नविनचंद्र मेहता इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि अँड डेव्हलपमेंट संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉ. रसिका मल्ल्या आणि विभागप्रमुख तसेच सांस्कृतिक समितीच्या प्रमुख डॉ. सुलक्षणा विसपुते यांनी व्यक्त केले.