'मराठी भाषेचे पाणिनी' दादोबा पांडुरंग तर्खडकर

17 Oct 2024 18:33:10
dadoba pandurang tarkhadkar 
 
मुंबई : मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ यांची आज पुण्यतिथी. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी मुंबईत झाला. शालेय वयात असतानाच आपणही मराठी भाषेचे व्याकरण लिहावे अशी त्यांची इच्छा होती. संस्कृत आणि इंग्रजी भाषांमधील व्याकरणाचा अभ्यास करून १८३६ त्यांनी मराठी भाषेच व्याकरण तयार केले. त्यांनी लिहिलेल्या व्याकरणाच्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १८६५ त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी लघुव्याकरणही लिहिले. मराठी भाषेचे व्याकरण तयार करून मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त करून देण्याचे मोलाचे कार्य दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केले म्हणूनच त्यांना ‘मराठी भाषेचे पाणिनी’ असे संबोधले जाते. व्याकरणकारासोबतच ते ग्रंथकार सुद्धा होते. ‘मराठी नकाशांचे पुस्तक’ (१८३६), ‘इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका’ (१८६०), ‘धर्मविवेचन’ (१८६८), ‘पारमहंसिक ब्राह्मधर्म’ (१८८०), अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तीनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या पदावर ते होते.
 
Powered By Sangraha 9.0