ठाण्यात 'अवधूता' कार्यक्रमाचे आयोजन

    17-Oct-2024
Total Views |
मैफल 
 
मुंबई : ठाण्यातील ग गप्पांचा समूह, ठाणे नगर वाचन मंदिर आणि ब्राह्मण शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवधूता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १९ ऑक्टोबर रोजी ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र विद्यालय सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पंडित कुमार गंधर्व यांच्या गाण्यांवर आधारित हा कार्यक्रम असणार आहे. गायक प्रशांत काळूंद्रेकर या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत. रवी नवले या कार्यक्रमात तबला वादन आणि श्रीरंग परब संवादिनी वादन करणार आहेत.