नाशिक जिल्हा रुग्णालयातील बाळ अदलाबदल प्रकरणात १० कर्मचारी निलंबित

    17-Oct-2024
Total Views |

nashik
 
मुंबई : (Nashik District Hospital) नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या अदलाबदलीच्या प्रकरणातील एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नोंदवहीतील चुकीच्या नोंदीमुळे हा प्रकार घडल्याचे माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बाळांची अदलाबदल झालीच नसल्याचा अहवाल दिला आहे.
 
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाळाचा रिपोर्ट तयार करताना फिमेलऐवजी मेल असे लिहिल्याने हा संभ्रम निर्माण झाल्याची माहिती या समितीने दिली आहे. अहवालामध्ये सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या तपासणीचाही उल्लेख करण्यात आला आहे.
 
तसेच या प्रकरणी कामातील हलगर्जीपणा केल्याने रुग्णालयातील १० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यांमध्ये ४ मुख्य डॉक्टर्स, २ प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स तसेच ४ परिचारिका यांचा समावेश आहे. तसेच तपासादरम्यान आणखी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिली आहे.