जेवणात थुंकणाऱ्यांना १ लाख रुपयांचा दंड! हॉटेलमध्ये सीसीटीव्ही लावणे अनिवार्य...

    17-Oct-2024
Total Views |

food
 
देहरादून : उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी यांच्या सरकारने अन्नात थुंकणाऱ्यांसाठी बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी कारवाई करण्याबाबत मोठा निर्णय घेतला. अन्नात थुंकणाऱ्यांनी जर असे कृत्य केल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची घोषणा केली. यासोबतच हॉटेल्स आणि ढाबे चालवणाऱ्यांची आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच स्वयंपाक घरात सीसीटीव्ही बसवण्याचा आदेश सरकारने दिला.
 
मुख्यमंत्री धामी यांनी जेवनात थुंकत असलेल्या घटनेवरून चिंता व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. उत्तराखंडचे आरोग्यमंत्री धनसिंग रावत म्हणाले की, सणांच्या काळात कोणत्याही प्रकारची अस्वच्छचा किंवा असामाजिक कृत्ये घडत आहेत, त्याला थारा दिला जाऊ नये. 
 
याप्रकरणी आता असे कृत्य केल्यास कडक कारवाईचे आदेश देण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना दिलेला इशारा लक्षात घेत पोलिसांनी आरोग्य आणि अन्न विभागाची मदत घेऊ शकता असे सांगितले आहे.
 
दरम्यान काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, बिहार येथील राज्यांमध्ये काही कट्टरपंथी हॉटेल मालकांनी जेवण बनवत असताना जसे की, भाकरी, चपातीमध्ये थुंकण्याच्या प्रामाणात अधिक वाढ होत आहे. यामुळे आता धामी यांनी जेवनात थुंकत असलेल्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली जात असल्याची माहिती आहे. यामुळे आता उत्तराखंड येथे असे कृत्य घडू नये, याची खबरदारी घेत धामी यांनी हा निर्णय घेतला आहे.