'वारी एनर्जीज लिमिटेड'चा आयपीओ येणार; जाणून घ्या कंपनीचा संपूर्ण तपशील

16 Oct 2024 16:36:08
waaree energies limited upcoming ipo


मुंबई : 
  'वारी एनर्जीज लिमिटेड'चा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) लवकरच बाजारात दाखल होणार आहे. वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दि. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. कंपनी आयपीओद्वारे ४,३२१ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ४,८००,००० इक्विटी समभाग विक्रीची ऑफर यामार्फत केली जाणार आहे.


हे वाचलंत का? -    भारतीय वापरकर्त्यांचा डेटा देशातच राहिला पाहिजे; आकाश अंबानींची परखड भूमिका


दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय भांडवली बाजारात नवनवीन आयपीओज दाखल होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता वारी एनर्जीज लिमिटेड आपला आयपीओ बाजारात घेऊन आला आहे. कंपनीने आयपीओ ऑफरकरिता १,४२७ ते १,५०३ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केला असून एका लॉट साईजमध्ये एकूण ९ शेअर्स मिळणार आहेत. दि. २३ ऑक्टोबर पर्यंत आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.

वारी एनर्जीज लिमिटेड दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बाँम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई)वर सूचीबध्द होणार आहे. दरम्यान, १९८९ मध्ये सुरू झालेली कंपनी सौर पॅनेल आणि संपूर्ण सौर ईपीसी सोल्यूशन्स निर्मितीमध्ये कार्यरत आहे. सोलर इन्व्हर्टर, 400MWh च्या उत्पादन क्षमतेसह ऊर्जा साठवणुकीसाठी लिथियम-आयन बॅटरी, सोलर थर्मल आणि सोलर आणि इंडस्ट्रियल केबल्ससह नाविन्यपूर्ण उत्पादननिर्मितीसह कंपनी गुजरातमधील सुरत, तुंब, नंदीग्राम आणि चिखली येथे उत्पादन सुविधा कार्यरत आहे.






Powered By Sangraha 9.0