जन्माला आला मुलगा, हातात दिली मुलगी

16 Oct 2024 17:42:21

nashik hospital
 
नाशिक : (Nashik District Hospital) मुलाला प्रसुती दिलेल्या महिलेच्या हातात मुलगी ठेवल्याचा प्रकार नाशिक शहरात समोर आला आहे. हा प्रकार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडला आहे. येथे एका महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र डिस्चार्ज घेताना रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून त्यांच्या हातात मुलगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एका महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. पण, डिस्चार्ज घेताना मुलगी झाल्याचे सांगत बाळ हातात देण्यात आले. रुग्णालयाच्या नोंदवहीमध्ये मुलगा झाल्याची नोंद असतानाही रुग्णालयाकडून मुलगी झाल्याचे सांगण्यात आले. घडलेल्या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत बाळ घेण्यास नकार दिला. तसेच रुग्णालयाच्या प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत जाब विचारण्यात आला. रुग्णालय प्रशासनाच्या या कारभारावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले. तसेच बाळ घेण्यासही नकार दिला. याबाबत सदर घटनेच्या चौकशीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी संबंधिताना दिले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0