महाराष्ट्रातील सागरी जीवांच्या नोंदी करा आता एका क्लिकवर; 'जलचर' अॅप करेल तुम्हाला मदत

16 Oct 2024 11:49:02
jalchar app



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
किनाऱ्यावर वाहून आलेले सागरी सस्तन प्राणी, कासवं, पक्षी किंवा समुद्रात दिसलेल्या सागरी जीवांच्या नोंदी ठेवणे आणि त्यासंबंधी यंत्रणेला सूचित करणे, आता सहजसोपे होणार आहे (jalchar bnhs). बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि कांदळवन प्रतिष्ठानने संयुक्तरित्या जलचर या अॅपची निर्मिती केली आहे (jalchar bnhs). यामुळे महाराष्ट्रातील सागरी जीवांची माहिती एकाच व्यासपीठावर संग्रहित करण्यासाठी मदत होणार आहे. (jalchar bnhs)
 
 
डाॅल्फिन, व्हेल आणि कासवासारखे सागरी जीव बऱ्याचवेळा किनाऱ्यावर जखमी अवस्थेता वाहून येतात. मच्छीमारदेखील जाळ्यात अडकलेल्या या जीवांना सुखरूप समुद्रात पुन्हा सोडतात. अशा जीवांची माहितीचे संकलन करण्यासाठी आणि या जीवांना वाचविण्यासाठी मदत मागण्यासाठी जलचर अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. हे अॅप इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये काम करणार आहे. स्थानिक मच्छीमार, संशोधक, तटरक्षक दल, नौदल कर्मचारी, असे सगळे भागधारक समुद्री जीवांच्या नोंदी घेऊ शकणार आहेत. महाराष्ट्रातील किनारपट्टी लगतच्या सागरी अधिवासात आढळणाऱ्या समुद्री प्राण्यांची इत्यंभूत माहिती संकलन करून त्याद्वारे सागरी जलचर प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी या अॅपची मदत होणार आहे. ॲपमध्ये जीपीएस प्रणालीचा वापर करून टॅग केलेली छायाचित्रे सुद्धा पाठविता येणार आहे.
 
 
मासेमार बांधव या अॅपचा अगदी सहज वापर करू शकतील. कारण अगदी मोबाईल सिग्नल नसतानाही सागरी जीवांची माहिती ते अॅपमध्ये साठवू शकतात. एखाद्या समुद्री जलचर प्राणी किनारपट्टीला लागणार असेल त्याची पूर्वसूचना वन विभागाला देवू शकणार आहेत. तातडीची मदत हवी असल्यास तशी नोंद करण्याची तरतूद या ॲपमध्ये आहे. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

अॅप डाऊनलोड करण्यासाठी 
https://play.google.com/store/apps/details?id=org.bnhs.jalchar&hl=en_IN
 
 
Powered By Sangraha 9.0