'गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन'तर्फे दसऱ्याच्या मुहूर्तावर ३०० आदिवासी गरजू लोकांना ब्लँकेट व चादरचे वाटप

    16-Oct-2024
Total Views |

gurukrupa
 
मुंबई : (Gurukrupa Heart Foundation) गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनतर्फे, विश्वस्त डॉ. गजानन रत्नपारखी अणि डॉ. स्मृती रत्नपारखी यांच्याकडून रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दहेजे ( ता. विक्रमगड, जि. पालघर ) ह्या गावामध्ये जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात ३०० आदिवासी गरीब गरजू लोकांना ब्लँकेट अणि चादरचे वाटप करण्यात आले .ह्या भागामध्ये खूप थंडी पडते, त्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
ह्या प्रसंगी गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनचे पदाधिकारी डॉ. राम चव्हाण, डॉ. प्रांजळ रत्नपारखी, डॉ. तेजस्विनी आणि सागर पांढरे, सचिन आणि दीपा श्रॉफ, प्रसाद आणि तृप्ती धोतरे, मनीष धोतरे, स्वाती जोसेफ, सनिल आणि वर्षा श्रॉफ उपस्थित होते. यांच्या हस्ते १०० विद्यार्थ्यांना वहया-पुस्तके तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
 

gurukrupa  
 
या कार्यक्रमाला पोलिस इंस्पेक्टर पारखे सहकुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक राहुल पाटील आणि जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकवृंदानी केले होते. डॉ. गजानन रत्नपारखी यांनी शाळेला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आणि चहापानने कार्यक्रमाची सांगता झाली. आदिवासी लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अणि हास्य गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आनंद देऊन गेला.
 
दरवर्षी अश्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुकृपा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. गजानन रत्नपारखी करत असतात. याचवर्षी २६ जानेवारीला विक्रमगड तालुक्यातील आश्रमशाळेत १२०० विद्यार्थ्यांना ब्लँकेट अणि चादरचे वाटप करण्यात आले होते. डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या निःस्वार्थ समाजकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.