१९ ऑक्टोबर रोजी पार पडणार 'गुणीजान बंदिश स्पर्धेची' अंतिम फेरी

16 Oct 2024 18:37:20
 pandit c r vyas
 
पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन (ग्रेस) फाउंडेशनतर्फे गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या देशपातळीवरील ‘गुणीजान बंदिश स्पर्धेची’ अंतिम फेरी १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. १६ ते ३० या वयोगटातील गायकांसाठी आयोजित या स्पर्धेत 125 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या ५० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. यात २५ मुली आणि २५ मुले आहेत. अंतिम फेरीही स्त्री आणि पुरुष अशा स्वतंत्र गटात होणार असून पहिल्या फेरीतून दहा, दुसऱ्या फेरीतून सहा तर तिसऱ्या फेरीतून प्रत्येकी तीन स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला असून बक्षीस वितरण मान्यवर परीक्षक कलाकारांच्या हस्ते होणार आहे.
Powered By Sangraha 9.0