अभिव्यक्ती तर्फे ‘खुले कवी संमेलन’ आणि ‘मेहेफिले मुशायरा’ कार्यक्रमाचे आयोजन

    16-Oct-2024
Total Views |

कवी संमेलन 
 
विरार : अभिव्यक्ती, विरारतर्फे ‘खुले कवी संमेलन’ आणि ‘मेहेफिले मुशायरा’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबर रोजी, दुपारी ३ वाजता जुन्या विवा महाविद्यालयासमोरील मंगलमूर्ती सभागृहात हे कार्यक्रम होणार आहेत. भागवत बनसोडे, सुनील ओवाळ, ज्योती बलिगा राव, रजनी निकाळजे, लक्ष्मण शिवणेकर, संध्या वैद्य, गौतम सकपाळ इत्यादि गझलकार ‘मेहेफिले मुशायरा’ साठी आणि पल्लवी बनसोडे, वर्जेश सोलंकी, प्रा. दीपाली ठाकूर, धर्मराज पाटील, मधुमती कुलकर्णी आणि स्वाती भोईर इत्यादी कलाकार कवी संमेलनासाठी उपस्थित असणार आहेत. गझल मुशायरा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी निकाळजे आणि कवी संमेलनाचे सूत्रसंचालन धर्मराज पाटील करणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, विरारचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे.