कल्याण पश्चिमेत महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचे काम प्रामाणिकपणे करणार- विश्वनाथ भोईर

कल्याण पश्चिमेत महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचे काम प्रामाणिकपणे करणार- विश्वनाथ भोईर

    16-Oct-2024
Total Views |


vishwanath bhior
 
 
 
 
कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.

आमदार भोईर यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा कार्यअहवाल मंगळवारी प्रसिध्द केला. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, विधानसभा संघटक संजय पाटील, प्रभूनाथ भोईर, महिला संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, उपशहर प्रमुख नितीन माने, अरविंद पोटे, सुनिल वायले, मोहन उगले, गणेश जाधव, विद्याधर भोईर, विजय देशेकर, दुर्याेधन पाटील, गोरख जाधव, हर्षला थविल, उज्वला मलबारी, सुजित रोकडे, अभिषेक मोरे, प्रतिक पेणकर, चिराग आनंद, अंकुश केणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भोईर म्हणाले, आमदार म्हणून निवडून आल्यानंतरची सुरूवातीची अडीच वर्ष ही कोवडशी लढण्यातच गेली. मात्र त्या काळात ही कोविड रुग्णालय असो, ऑक्सिजन प्लांट असो, इतर वैद्यकीय साधनसामुग्री असो या सर्वासाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला. तर कोविडनंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि मग ख:या अर्थाने कल्याण पश्चिमेमध्ये विकासाची गंगा वाहण्यास सुरूवात झाल्याची माहिती त्यांनी दिली. तर या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघातील आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांसह कडोंमपाला स्वतंत्र धरण असावे यासाठी प्रामाणिकपणो प्रयत्न केल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.

चौकट- कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार निधी, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमएसआरडीसी अशा विभागातील तब्बल 2 हजार 38 कोटींची विकासकामे सुरू आहेत. नगरसेवक नसल्याने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात कोणताही दुजाभाव न करता आपण विकासकामे केली असल्याचे ही भोईर यांनी सांगितले.

चौकट- कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिंदे सेनेकडून अनेक जण इच्छूक आहेत. त्याविषयी आमदार भोईर म्हणाले, इच्छुक असणो काही गैर नाही. इच्छुकांची संख्या जास्त म्हणजे पक्षाचा आलेख चढता आहे. उबाठा गटाचे साईनाथ तारे यांनी आमदार भोईर यांनी काही विकासकामे केलेली नाहीत असा आरोप केला होता. याविषयी आमदार भोईर यांनी सांगितले की ,तारे यांना माझा कार्य अहवालाची प्रत बाय पोस्ट अथवा हार्ड कॉपी पाठविणार आहे. त्यानंतर त्यांनी ठरवावे की काम झाले आहे की नाही.
------------------------------------------------------------