“आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य...." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

    16-Oct-2024
Total Views |
 Narendra Modi
 
मुंबई : “आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे... त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर व्यक्त केली आहे.
 
प्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. भरत बलवल्ली यांच्या ‘भरतवाक्य’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार १४ ऑक्टोबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात डॉ. भरत बलवल्ली यांच्या तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्री स्वामी समर्थ यांची ही मूर्ती भेट म्हणून देण्यात आली आहे.