साहित्य अकादमी तर्फे ‘कवीसंधी’ या कार्यक्रमाचे

16 Oct 2024 19:40:12
Mahesh Keluskar 
 
मुंबई : साहित्य अकादमी तर्फे ‘कवीसंधी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी दादर मधील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्गावरील साहित्य अकादमीच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मराठी कवी महेश केळुसकर यांच्या कवितांचे वाचन होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य अकादमी तर्फे करण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0