लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरसह फुटीरतावादी, एनआयएनचा दावा

16 Oct 2024 21:27:18

Lawrence Bishnoi
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकींवर १२ ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात सिद्दिकीचा वांद्रे येथे मृत्यू झाल्याची घटना आहे. याप्रकरणात गँगस्टर म्हणून ओळख असलेला लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी आता राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेनेने (एनआयए) लॉरेन्स बिश्नोईबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा केवळ गँगस्टर नसून खलिस्तानवाद्यांशी त्याचे संबंध असल्याची माहिती देण्यात आली.
याप्रकरणात तीन चार्जशीट एनआयएने दाखल केल्या आहेत. या चार्जशीटमध्ये लॉरेन्स बिश्नोई हा कॅनडा आणि पाकिस्तान येथील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याचे खलिस्तानवाद्यांशी संबंध असल्याची माहिती आहे. देशाच्या वेगवेगळ्या तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईला अटक करण्यात आली होती.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहातील सुरक्षित अंडा सेल येथे कैद करण्यात आले आहे. सेलभोवती सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती आहे.
 
Powered By Sangraha 9.0