"भारत-पाकिस्तानच्या मैत्रीत दरी येत असेल तर...", परराष्ट्र मंत्री जयशंकरन यांनी सुनावले

16 Oct 2024 19:46:21

Jaishankar
 
इस्लामाबाद : शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी भारतीचे परराष्ट्रमंत्री जयशंकर हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर १६ ऑक्टोबर २०२४ रोजी होते. पाकिस्तानात वृक्षरोपणाच्या मोहिमेअंतर्गत त्यांनी वृक्षरोपण केले होते. यावेळी त्यांनी शिखर परिषदेत बोलत असताना संबोधित केले असता त्यांनी दहशतवादावर भाष्य केले.
 
यावेळी चीन किंवा पाकिस्तानचे नाव न घेता परराष्ट्रमंत्री म्हणाले की, सर्व देशांनी एकमेकांच्या सीमांचा आदर करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी, एससीओ बैठकीचे उद्घाटन करत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तानला शांतता, सुरक्षा आणि सामाजिक आणि आर्थिक प्रगती हवी आहे. तेव्हाच पाकिस्तानशी आपला व्यापार होऊ शकेल. अन्यथा आपला व्यापार होऊ शकत नसल्याचे जयशंकर म्हणाले आहेत.
 
त्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या बैठकीत सांगितले की, जर भारत-पाकिस्तानाचा एकमेकांवरील असणारा विश्वास कमी होत असेल किंवा मैत्रीत दरी येत असेल तर त्यामागील कारणांचे विश्लेषण आपण करणे गरजेचे आहे. पाकिस्तान-चीन सीपीईसी प्रकरणाने भारतीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
 
जयशंकर म्हणाले की. एक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकींशी लढा देणे आवश्यक आहे. यासाठी एकमेकांवर विश्वास आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. यासाठी दोन्ही देशांतील संवाद, विश्वास, भारत-पाकिस्तानचे परस्पर असलेले हितसंबंध आणि बांधिलकी आवश्यक असल्याचे जयशंकर म्हणाले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0