महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना! डॉ. सदानंद मोरे यांची मंडळाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

15 Oct 2024 19:36:26


सदानंद मोरे  

 मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची १५ ऑक्टोबर रोजी पुनर्चना करण्यात आली आहे. डॉ. सदानंद मोरे यांची मंडळाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती आणि प्रदीप ढवळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रा. अविनाश सप्रे, श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. दासू वैद्य, प्रा. श्रीधर नांदेडकर, प्रा. प्रकाश होळकर, डॉ. आशुतोष पाटील, डॉ. प्रमोद मुनघाटे, श्रीमती प्रभा गणोरकर, प्रा. सदानंद देशमुख, डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रा. डॉ. राजेश विश्वनाथ गायकवाड, श्री. श्रीपाद अपराजित, डॉ. बी. जी. शेखर पाटील, श्री. जयू भाटकर, श्री. विनोद सूर्यनारायण कुलकर्णी, श्री. भरत गावडे, डॉ. मोनिका ठक्कर, मिलिंद कुलकर्णी, शेखर सावंत आणि विठ्ठल कदम यांची मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

“या मंडळाची ही जी जबाबदारी शासनाने आणि लोकांनी माझ्यावर सोपवली आहे ती या पूर्वी दोन वेळा चांगल्या पद्धतीने निभावली, तशीच यावेळी निभावण्याचा प्रयत्न करणार. यापूर्वी दोन वेळा मी ती चांगल्या पद्धतीने निभावली असेन म्हणूनच पुन्हा एकदा ती एकदा माझ्यावर सोपवण्यात आली आहे. पूर्वीपेक्षा अधिक चांगली कामे करण्याचा यावेळी प्रयत्न करणार” डॉ. सदानंद मोरे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
 
Powered By Sangraha 9.0