उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून निर्णय

    15-Oct-2024
Total Views |
 
ahilyadevi holkar
 
ठाणे : (Ahilyadevi Holkar)ठाण्यातील उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यात आले असून याच लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 
आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलावालगत घाटाची निर्मिती करण्यात आली होती. या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली होती. प्रतिष्ठानने केलेली मागणी मान्य करत आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट असे नाव दिले आहे असून या घाटाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला. तर जागेवर धनगर समाज बांधवांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचे अध्यक्ष माधवी बारगीर, यशवंत सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजीत कोकरे, समाजसेवक अभिजीत चोरामले, शिक्षक सेनेच्या महिला अध्यक्ष शोभा गरांडे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा वर्षा माने, भाजपा वार्ड अध्यक्ष संदीप माने, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे, उपाध्यक्ष बाळा विरकर, खजिनदार अनिल जरग, कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर, सुरेश भांड, संतोष बुधे, दीपक झाडे, उद्धव गावडे, उत्तम यमगर, नामदेव चांगण, अनिकेत पाडसे, मनोज खाटेकर, वैभव सामसे, सुनील पळसे, महिला मंडळ सचिव गायत्री गुंड, सुषमा बुधे, सुजाता भांड, सीमा कुरकुंडे, तृप्ती पाडसे आदिसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
नदीवर घाट बांधण्याची मूळ संकल्पना ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आहे. संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी त्यांनी घाट उभारले आहेत. त्यामुळे या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी धनगर प्रतिष्ठानने केली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आले असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट असे नाव देण्यात आले आहे. यामुळे धनगर प्रतिष्ठानने आमदार प्रताप सरनाईक यांचा सत्कार करून त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच या नावाच्या निर्मितीसाठी परिश्रम घेणारे ठेकेदार सत्या लांडगे यांचे देखील प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.