किरकोळ महागाईच्या आकडेवारीने गुंतवणूकदार निराश!

    15-Oct-2024
Total Views |
investors-disappointed-with-retail-inflation-data


मुंबई :   
 भारतीय भांडवली बाजारात आज किरकोळ घसरण पाहायला मिळाली असून सेन्सेक्स १५३ अंकांनी घसरत ८१,८२०.१२ तर निफ्टी २५,०५७ पातळीवर बंद झाला. दरम्यान, किरकोळ महागाईच्या आकडेवारीने गुंतवणूकदार निराश असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला. सप्टेंबरमधील किरकोळ चलनवाढीचे आकडे गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे आलेले नाहीत. याचा नकारात्मक परिणाम भांडवली बाजारावर दिसून आला आहे.


दरम्यान, मागील महिन्यात झालेली किरकोळ चलनवाढीचे आकडे गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे आलेले नाहीत. त्यामुळे लवकरच व्याजदरात कपात होण्याच्या गुंतवणूकदारांच्या शक्यतेला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापासून बाजारात चढ-उतारांची मालिका सुरूच आहे. सोमवारी वाढ झाल्यानंतर पुन्हा शेअर बाजारात घसरण झाली. मेटल आणि ऑटोमोबाईल कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरला आहे.

बीएसई निर्देशांक सेन्सेक्स ८२,१०१.८६ अंकांच्या वाढीसह उघडला. दिवस अखेर बाजार बंद होताना सेन्सेक्स १५२.९३ अंकांनी घसरून ८१,८२०.१२ वर बंद झाला. एनएसई निफ्टी-५० देखील ७०.६० अंकांच्या घसरणीसह २५,०५७.३५ वर बंद झाला. आयसीआयसीआय बँकेचा समभाग सर्वाधिक १.९० टक्क्यांनी बंद झाला. याशिवाय भारती एअरटेल, एशियन पेंट्स, अल्ट्रा सिमेंट, एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ तर बजाज फायनान्सचा समभाग सर्वाधिक २.७३ टक्क्यांनी घसरला.