भारताचे जागतिक स्तरावर आणखी एक पाऊल पुढे!

    15-Oct-2024
Total Views |
india-mobile-congress-india-ready-to-lead


मुंबई :   
  भारत जागतिक स्तरावर ६जी क्रांतीचे नेतृत्व करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. ते म्हणाले, भारताने ४जी मध्ये जगाचे अनुसरण केले तर ५जी मध्ये जगासोबत पुढे गेलो, पण आम्ही ६जी मध्ये जगाचे नेतृत्व करू. ही सरकारचा विश्वास आणि बांधिलकी आहे, असेही मंत्री सिंधिया यांनी सांगितले.




सिंधिया म्हणाले की, ५जी सेवा भारतात सर्वात जलद सुरू झाली. फक्त २१ महिन्यांच्या कालावधीत ९८ टक्के जिल्हे आणि ९० टक्के गावांमध्ये याचा विस्तार करण्यात आला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ ६जी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे नाही तर देशाला या दिशेने नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

इंडिया मोबाइल काँग्रेस आणि आंतरराष्ट्रीय ६G सिम्पोजियम ६G मधील स्थानिक आणि जागतिक प्रगती दर्शविते. सिंधिया म्हणाले की दूरसंचार कायदा २०२३ मध्ये केलेले बदल याच आधारावर तयार केले गेले आहेत. भारतातील दूरसंचार पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी, उपग्रह संप्रेषणाच्या उच्च संभाव्य क्षेत्रासारख्या आतापर्यंतच्या अनपेक्षित क्षेत्रांवर प्रकाश टाकण्यासाठी, डिजिटल युगातील आव्हानांना सामोरे जाणे, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे सायबर सुरक्षा, असेही केंद्रीय मंत्री सिंधिया यावेळी म्हणाले.