भारताची वाटचाल टेक क्रांतीच्या दिशेने! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं IMC 2024 कार्यक्रमाचं उद्धाटन

    15-Oct-2024
Total Views |

modi it
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८व्या इंडिया मोबाईल काँग्रेस या टेक इव्हेंटचे नवी दिल्ली येथे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील गगनभरारीवर अभिमान व्यक्त केला. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील प्रगतीचा इतिहास डिजिटल सर्वसमावेशकतेचा इतिहास आहे असे सुद्घा मोदी म्हणाले.

परवडणारा डेटा भारतातच.
पंतप्रधान यांच्या भाषणातील महत्वाचे सूत्र हे परवडणाऱ्या डेटाच्या संदर्भात होते. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे जिथे स्वस्त दरात नागरिकांना डेटा उपल्बध करुन दिला जातो. यामुळे कोट्यावधी भारतीय आज जगाशी जोडले गेले आहेत. यामुळे आजच्या तारखेला या डिजिटल अर्थव्यवस्थेचा फायदे घेत भारतीय नागरिक प्रगतीच्या नव्या वाटा निर्माण करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या यशाचे श्रेय अनेक गोष्टींना दिले जसे की, दूरसंचार वाहीन्यांचे विस्तारलेले जाळे, 5G नेटर्वक मध्ये केलेली गुंतवणूक, या मुळे परिवर्तन घडून आले.

डिजिटल क्रांतीच्या दिशेने
फायबर नेटवर्कस् मध्ये भारताने केलेल्या गुंतवणुकीमुळे भारताच्या कानाकोपऱ्यात आज सर्वात वेगवान इंटरनेट सेवेचा लाभ भारतीयांना मिळतो आहे. अधिकाधिक भारतीयांपर्यंत या कनेक्टिव्हिटीचा लाभ पोहोचत राहावा यासाठी इंटरनेट डेटाचे दर टिकवून ठेवण्याला प्राधान्य राहील यावर पंतप्रधानांनी भर दिला. जगातील ४० टक्के डिजिटल व्यव्हार आज भारतात होतात. असे म्हणत पंतप्रधानांनी भारताच्या वर्चस्वाची जाणीव करुन दिली. भारत सरकार सध्या डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीवर भर देत असून, डिजिटल क्रांतीच्या दिशेने आपण पुढचे पाऊल टाकल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
इंडिया मोबाईल काँग्रेस हा आशियातला सर्वात मोठा टेक इव्हेंट असून,१५ ते १८ ऑक्टोबर असे ४ दिवस, नवी दिल्लीच्या प्रगती मैदानवर हा सोहळा पार पडणार आहे.