ह्युंदाई आयपीओला सकारात्मक प्रतिसाद; कंपनी २२ ऑक्टोबरला सूचीबध्द होणार

    15-Oct-2024
Total Views |
hyundai motor ipo investors response
 

मुंबई :       ह्युंदाई मोटर कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. ह्युंदाई मोटर आयपीओच्या माध्यमातून बाजार भांडवल उभारणी करणार असून दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान खुला असणार आहे. कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून २७,८७०.१६ कोटी रुपये भांडवल उभारले जाणार आहे. ह्युंदाई मोटर्स आयपीओचा एक लॉट ७ शेअर्सचा असून १८६५-१९६० प्राईस बँड ठेवण्यात आला आहे. २२ ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर कंपनी सूचीबध्द होणार आहे.




मूळ दक्षिण कोरियन कंपनी असलेली ह्युंदाई मोटर या भारतातील कंपनीने आयपीओ लाँच केला आहे. कंपनीच्या आयपीओ बद्दल विश्लेषक सामान्यतः सकारात्मक असतात. कारण कंपनीचे मूल्यांकन उद्योगातील प्रमुख मारुती सुझुकी इंडियाच्या तुलनेत कमी आहे. विशेष म्हणजे केआर चोक्सी, आनंद राठी रिसर्च, अरिहंत कॅपिटल, एलकेपी सिक्युरिटीज आणि एसबीआय सिक्युरिटीज यांसारख्या अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी रिव्ह्यू जारी केला आहे.
 
विविध ब्रोकरेज कंपन्यांकडून ह्युंदाई मोटर आयपीओला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सबस्क्राईब करण्याचे आवाहन ब्रोकरेज कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना करण्यात येत आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलातून उत्पादन क्षमता वाढविण्याची योजना आखत आहे. सद्यस्थितीस कंपनीने चेन्नई, तामिळनाडू येथील बॅटरी असेंब्ली प्लांटमध्येही गुंतवणूक केली आहे. २०२४ मध्ये (Hyundai) मोटर कंपनी आणि (Kia) कॉर्पोरेशनने आगामी इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्थानिकीकरणाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी धोरणात्मक सहकार्यासाठी एक्साईड एनर्जी सोल्यूशन सोबत करार केला आहे.