आगामी काळात ५ लाख नोकऱ्या निर्माण करणार; बड्या उद्योग समूहाकडून घोषणा!

15 Oct 2024 16:33:08
five-lakh-jobs-in-upcoming-year


मुंबई :      टाटा समूह येत्या काळात बंपर रोजगारनिर्मिती करेल, असा दावा अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी केला आहे. टाटा समूह येत्या काळात ५ लाख रोजगार निर्माण करणार असून आम्ही अनेक प्लांट्स उभारत आहोत, असेही चंद्रशेखरन यांनी सांगितले. आसाममधील समूहाच्या आगामी सेमीकंडक्टर प्लांट तसेच इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीसाठी इतर नवीन उत्पादन युनिट्सचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.




दरम्यान, टाटा समूह पुढील पाच वर्षांत सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी आणि इतर संबंधित उद्योगांमध्ये पाच लाख उत्पादन नोकऱ्या निर्माण करेल, अशी घोषणाच टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी केली. इंडियन फाऊंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंटच्या परिसंवादात बोलताना जर देश मॅन्युफॅक्चरिंग नोकऱ्या निर्माण करू शकत नसेल तर भारत विकसित राष्ट्र होण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकत नाही, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे सेमीकंडक्टर्समधील टाटा समूहाची गुंतवणूक, अचूक उत्पादन, असेंबली, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी आणि संबंधित उद्योगांमधील समूहाची गुंतवणूक या गोष्टी विचारात घेता पुढील पाच वर्षांत आम्ही पाच लाख उत्पादन रोजगार निर्माण करू, असा विश्वास चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला. जर आपण उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करू शकलो नाही, तर आपण विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करू शकत नाही, असेही चंद्रशेखरन म्हणाले.





Powered By Sangraha 9.0