'डीजीसीए'कडून स्पाईसजेटला मोठा दिलासा; अतिरिक्त निधी उपलब्धतेचा परिणाम!

15 Oct 2024 18:00:04
dgca-removed-spicejet-from-additional-monitoring-system


मुंबई :      नागरी विमान वाहतूक संचालनालया(डीजीसीए)कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्पाईसजेट एअरलाईनला मोठा दिलासा मिळाला असून डीजीसीएकडून विशेष देखरेख काढण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीतील कमतरता दूर करण्यासाठी आणि अतिरिक्त निधी उभारण्यासाठी उचललेल्या पावलांच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.



स्पाइसजेटला वर्धित देखरेख प्रणालीतून काढून टाकण्यात आले आहे, असे नियामकाने म्हटले आहे. एअरलाइनने उणीवा दूर करण्यासाठी निधी उभारला असून स्पाइसजेटला अतिरिक्त पाळत ठेवण्याच्या नियमातून बाहेर काढले आहे, असे डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विमान वाहतूक नियामक असलेल्या डीजीसीएने कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना केल्यानंतर, कंपनीच्या दायित्वांची पूर्तता करण्यासाठी निधी उभारल्यानंतर हा निर्णय आला आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए)ने स्पाईसजेट एअरलाईन्सची आर्थिक अडचणी लक्षात घेऊन दि. १३ सप्टेंबर रोजी अतिरिक्त पाळत ठेवली होती. आर्थिक अडचणींमुळे विमान देखभालीशी संबंधित एअरलाइनच्या बंधनांवर परिणाम होऊ शकतो. डीजीसीएने विविध ठिकाणी एकूण २६६ 'स्पॉट' तपासण्या केल्या. डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी एअरलाइन योग्य पावले उचलते याची खात्री करण्यात आली आहे.






Powered By Sangraha 9.0