भारतीय वापरकर्त्यांचा डेटा देशातच राहिला पाहिजे; आकाश अंबानींची परखड भूमिका

    15-Oct-2024
Total Views |
data-of-indian-users-should-remain-within-the-country


मुंबई :    भारतीय वापरकर्त्यांचा डेटा देशातच राहिला पाहिजे, अशी भूमिका देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी मांडली. वापरकर्त्यांचा डेटासह कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंगसाठी डेटा केंद्रे स्थापन करण्यास इच्छुक असलेल्या भारतीय कंपन्यांना विजेसह इतर प्रोत्साहने देण्यावरही अंबानी यांनी भाष्य केले.




दरम्यान, आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी आणि उत्पादन यासह प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यासाठी एआय हे क्रांतिकारी साधन असल्याचे वर्णन केले. २०४७ पर्यंत भारताचे विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एआय अत्यंत महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला.
 
अंबानी म्हणाले, आम्ही एआयचे फायदे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी, भारतातील प्रत्येकाला परवडणाऱ्या दरात शक्तिशाली एआय मॉडेल आणि सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. रिलायन्स जिओ मोबाइल ब्रॉडबँडच्या बाबतीत जसे होते तसे एआयचे फायदे सर्वत्र प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही अंबानी यांनी सांगितले.