मानखुर्दमध्ये 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवन'

मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार गोपिचंद पडळकर यांच्या हस्ते भूमिपूजन

    15-Oct-2024
Total Views |

ahilyadevi bhavan
 
मुंबई : (Punyashlok Ahilyadevi Bhavan) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने मानखुर्दमध्ये उभारण्यात येणाऱ्या वास्तूचे मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार गोपिचंद पडळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 'चिल्ड्रन अँड सोसायटी' संचालित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवन' उभे राहणार आहे.
 
याविषयी माहिती देताना मंत्री लोढा म्हणाले, मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे भवन उभारण्यात येत आहे. भारतातील पहिल्याच अहिल्यादेवी भवनात मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एका छताखाली येणार आहेत. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भवन उभारण्यासाठी ४७ कोटी इतका खर्च अपेक्षित असून, ३५ हजार चौरस मीटर इतक्या परिसरात ही वास्तू बांधली जाणार आहे.
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मतिथीचे हे ३०० वे वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून मुंबई उपनगर जिल्ह्यात भारतातील पहिले पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.