जालना : एकीकडे विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. सोमवारी मध्यरात्री त्यांनी ही भेट घेतली असून त्यांच्यात काय चर्चा झाली याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही.
मंत्री उदय सामंत यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे हेदेखील उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. मनोज जरांगे आणि उदय सामंत यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. परंतू, या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हे वाचलंत का? - अजितदादांचा काँग्रेसला धक्का! आमदार हिरामण खोसकर राष्ट्रवादीत दाखल
मनोज जरांगेंनी यावर्षी पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा घेतला. तसेच आचारसंहितेनंतर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, विधानसभा निवडणूकीत मनोज जरांगे आपले उमेदवार उभे करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.