उबाठा गटाला दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

15 Oct 2024 13:48:06
 
Thackeray
 
मुंबई : राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यासाठी उबाठा गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणीही पार पडली. परंतू, न्यायालयाने या आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
 
राज्यपाल नियूक्त १२ आमदारांचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ७ आमदारांची नियूक्ती करणं योग्य नाही, असा आरोप उबाठा गटाने केला आहे. उबाठा गटाने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. परंतू, न्यायालयाने सात आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला.
 
हे वाचलंत का? -  राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी घेतली शपथ!
 
मंगळवारी दुपारी या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये भाजपचे विक्रांत पाटील, चित्रा वाघ आणि बाबूसिंग महाराज राठोड यांचा समावेळ आहे. तर शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांचा समावेश आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0