पिपाणीमुळे होणार पवारांची अडचण! तुतारी चिन्ह विरुद्ध पिपाणी संभ्रम कायम

15 Oct 2024 17:37:57
 

Sharad Pawar
 
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्हावर बंदी आणण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणूकीत आम्हाला पिपाणी चिन्हाचा फटका बसला आहे, असे सांगत शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहीले होते. पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. परंतू, आयोगाने पिपाणी चिन्ह हटवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता विधानसभेतही तुतारी चिन्ह विरुद्ध पिपाणी हा संभ्रम कायम राहणार आहे.
 
हे वाचलंत का? -   मोठी बातमी! २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला मतमोजणी! कसं आहे निवडणूकीचं वेळापत्रक?
 
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "राष्ट्रवादी शरद पवार गटाने वोटिंग मशीनवर तुतारी चिन्ह लहान दिसतं. त्यामुळे त्याचा आकार वाढवण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर वोटिंग मशीनवर त्यांना त्यांचं चिन्ह कसं दिसणं अपेक्षित आहे, याबद्दल आम्ही त्यांनी विचारलं. त्यांनी आम्हाला एक दोन पर्याय दिले. त्यातला पहिला पर्याय आम्ही मान्य केला. तसेच पिपाणी चिन्ह हटवण्याचीही मागणी त्यांनी केली होती. परंतू, तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी हे दोन्ही चिन्ह वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांची ही मागणी आम्ही मान्य केलेली नाही," असे त्यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0