भारत शक्तिशाली राष्ट्र बनवण्यात रा.स्व.संघाचा मोठा वाटा

15 Oct 2024 14:58:13

Pulak Sagar Maharaj

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pulak Sagar Maharaj on RSS) 
भारत एक शक्तिशाली राष्ट्र बनला आहे, ज्यामध्ये संघाचा मोठा वाटा आहे. संघ स्वयंसेवकांकडून देशभक्ती, शिस्त, चारित्र्य आणि सचोटी शिकायला हवी. संघ कोणत्याही पक्ष, जात, धर्माच्या विरोधात नाही. प्रत्येक स्वयंसेवकासाठी राष्ट्र प्रथम येते.", असे प्रतिपादन पुलक सागर महाराज यांनी केले. उदयपुर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते.

हे वाचलंत का? : वक्फच्या जमिनीवर खरगेंचा ताबा? जेपीसीच्या बैठकीत मोठी पोलखोल

संघ शताब्दीबाबत बोलताना ते म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करताना प्रत्येक मंडल आणि ग्रामस्तरावर शाखा कार्य पोहोचवायचे आहे. त्यासोबतच शाखेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकासाचा वेग वाढवावा लागेल. अस्पृश्यतेचा रोग संपवून प्रत्येक हिंदूला तो आत्मसात करावे लागेल. याशिवाय समाजात संयुक्त कुटुंब पद्धतीलाही चालना द्यावी लागेल."


Udaypur Vijayadashmi Utsav

पुलक सागर महाराज यांनी दि. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "बिरसा मुंडा यांनी आपले सर्वस्व सामाजिक प्रबोधनासाठी समर्पित केले. महापुरुष कोणत्याही एका समाजाचे नसतात, ते सर्वांचे असतात." पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्य, समरसता, स्वदेशी हे पंचपरिवर्तनाचे विषय समाजापर्यंत नेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले की, भारताला धोका शत्रूंकडून नसून भारतात राहणाऱ्या षड्यंत्र रचणाऱ्या घटकांकडून आहे. षड्यंत्रवादी शक्ती हिंदू समाजात फूट पाडण्याचा दुष्ट प्रयत्न करत आहेत. स्वयंसेवक त्यांचा हेतू सफल होऊ देणार नाहीत.

Powered By Sangraha 9.0