रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा 'प्रबोधिनी दिन'

15 Oct 2024 17:38:40

Prabodhini Day

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Prabodhini Day) रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा वर्धापन दिवस 'प्रबोधिनी दिन' शनिवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन, भाईंदर पश्चिम येथे सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी सकाळी १० वा. आयआयडीएलच्या आठव्या बॅचचा स्वागत समारंभ आणि सातव्या बॅचला दीक्षांत समारंभ संपन्न होईल.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची उपस्थिती असेल, तर सन्माननीय अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग उपस्थित असतील. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ.विनय सहस्रबुद्धे सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

त्यानंतर दुपारी ठीक १२ वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या 'राजकारणाचे बदलते स्वरूप आणि युवा नेत्यांसाठीच्या शक्यता' या विषयावर उपस्थितांना संबोधित करतील. उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य, माजी मंत्री डॉ. महेंद्र सिंह यांच्या समारोपीय भाषणाने सायंकाळी ५.३० वा. कार्यक्रमाची सांगता होईल.
Powered By Sangraha 9.0