"...तर मी उद्यापासून सामनामध्ये काम करेन"; नितेश राणेंचं संजय राऊतांना आव्हान

15 Oct 2024 12:39:55
 
Raut & Rane
 
मुंबई : संजय राऊतांनी एक तरी पुरावा दिला, तर मी उद्यापासून त्यांच्यासोबत सामनामध्ये काम करेन, असे आव्हान भाजप नेते नितेश राणेंनी दिले आहे. महायूतीच्या उमेदवारांसाठी १०-१५ कोटींचा पहिला हफ्ता मतदारसंघात आल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली.
 
नितेश राणे म्हणाले की, "सकाळी उठून बेछूट आरोप करणे, खोट बोलणे आणि प्रसिद्धी मिळवणे यावरच संजय राऊतांचं दुकान चालतं. महायूतीच्या उमेदवारांसाठी १०-१५ कोटींचा पहिला हफ्ता मतदारसंघात आला, असं वक्तव्य केल्यानंतर लगेच ब्रेकिंग न्यूज बनते. मात्र, काही दिवसांनंतर अब्रुनुकसानीबाबत कोर्टाच्या नोटीसा मिळवल्यानंतर हेच संजय राऊत माफी मागतात. १० ते १५ कोटी प्रत्येक उमेदवाराच्या मतदारसंघात आले आहेत, याचा एकतरी पुरावा संजय राऊतांनी दिला तर मी उद्यापासून त्यांच्यासोबत सामनामध्ये काम करायला जाईल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट!
 
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या कर्जतच्या फार्महाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणूकीसाठी पैसे उतरवण्यात आले असल्याची माहिती आमच्याकडे आली आहे. यावर निवडणूक आयोगाने लक्ष घालावं. कर्जतच्या फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात कॅश आली आहे, याचीसुद्धा चौकशी व्हायला हवी," अशी मागणीही त्यांनी केली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0