लाडक्या बहिणींना फसवणारी, गंडवणारी आणि झिडकारणारी महाआघाडी!

15 Oct 2024 14:57:16
 
MVA
 
मुंबई : लाडक्या बहिणींना फसवणारी, गंडवणारी आणि झिडकारणारी महाआघाडी, असे म्हणत भाजपच्या जाहिरातीतून महाविकास आघाडीची पोलखोल करण्यात आली आहे. मंगळवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये ही जाहीरात प्रसिद्ध करत मविआवर निशाणा साधला आहे.
 
महाविकास आघाडीने तेलंगणामध्ये महिलांना २५०० रुपये दिले नाही. तसेच हिमाचल प्रदेशात महिलांना १५०० रूपये देणार अशी थाप मारून फसवलं आहे, असे या जाहीरातीत म्हटले आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये अंगणवाडी आणि आशा सेविकांना वाढीव मानधन देणार असं सांगून गंडवलं आणि झारखंडमध्ये बिनव्याजी २ हजार रुपये देणार सांगून झिडकारलं, अशी टीका या जाहीरातीमध्ये भाजपकडून महाविकास आघाडीवर करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0