मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्यात अनेक पक्षप्रवेश सुरु आहेत. अशातच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का गिला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हिरामण खोसकर हे काँग्रेसचे इगतपुरीचे विद्यमान आमदार आणि आदिवासी समाजाचे नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्य उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान, आमदार खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची व लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.